Mukhyamantri Ladki Bahin Yojana January Installment Delay: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देत आहे. या योजनेचा फायदा आतापर्यंत 2.5 कोटी महिलांना झाला आहे, आणि प्रत्येक महिन्याचा हप्ता त्यांना नियमितपणे मिळत आहे. मात्र, जानेवारी महिना सुरू होऊन 15 दिवस उलटले तरी, लाडकी बहीण योजनेचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही.
Ladki Bahin Yojana January Hafta : महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे नेमके कधी जमा करणार (January Hafta Ladki Bahin Yojana) याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.ज्या महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केले होते पण त्यातील ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नव्हते अशा महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याच्या हप्त्यामध्ये जुलैपासून ते डिसेंबरपर्यंतचे एकूण 9 हजार रुपये जमा करण्यात आले. पण, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये होणार?
गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेला एक मोठा राजकीय मुद्दा बनवला होता. महायुतीच्या नेत्यांनी असे आश्वासन दिले होते की, जर पुन्हा सत्ता मिळाली तर योजनेचे पैसे 1500 रुपयांवरून 2100 रुपये केले जातील. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, मार्च महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होईल. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहमती दर्शवली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
🔥 लेटेस्ट अपडेट 👉 जानेवारीच्या हफ्त्याबाबत मोठी अपडेट.
कधी मिळणार 2100 रुपये?
Ladki Bahin Yojana 7 Va Hafta Kadhi Yenar: महिलांचे हे सवाल नेहमीच उपस्थित होत आहेत की, 2100 रुपये कधी मिळणार? तसेच, अनेक महिलांना या योजनेतुन अन्य काही लाभ मिळावेत अशी अपेक्षा आहे. महायुती सरकारने विधानसभेत 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु हे 2100 रुपये मार्च महिन्यापर्यंत लागू होण्याची शक्यता आहे.
🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana 2100 Kadhi Milnar: 2100 रुपये कधी मिळतील? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संकेत.
भुजबळ यांचे विधान आणि वाद
राज्याच्या राजकारणात लाडकी बहीण योजनेबाबत अजून एक मोठा मुद्दा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी योजनेवर प्रतिक्रिया देताना एक महत्त्वाचे विधान केले. त्यात, ज्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत अशा महिलांकडून दंडासह पैसे वसूल करण्यात यावेत असे म्हटले. महिलांना पैसे परत करण्याची गरज नाही, मात्र नियमात न बसणाऱ्या महिलांनी आपली नावे काढून घ्यावीत, असे ते म्हणाले.
सध्या महिलांची प्रतीक्षा वाढली आहे की, येणाऱ्या दिवसांत या योजनेच्या हप्त्याबाबत काय निर्णय घेतला जाईल, आणि 2100 रुपये कधी मिळणार यावर सरकारची अधिकृत माहिती कधी समोर येईल.
🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana New Registration 2025; लाडकी बहीण योजना नवीन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू, आता असा करा अर्ज.
मुख्यमंत्री माझो लाडकी बहीण योजनेचा राज्यातील करोडो महिलांना लाभ मिळत आहे, परंत योजनेचा हप्ता नेमका कधी वाढवला जाईल आणि 2100 रुपये कधी मिळणार याबद्दल अनेक महिलांना उत्तराची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारने लवकरच याबाबत स्पष्टता दिल्यास महिलांना योग्य लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
🔴 नोकरीं 👉 Railway Bharti 2025 : 4000 हून अधिक पदांसाठी भरती, कोणत्याही परीक्षेशिवाय रेल्वेत नोकरी! असा करा अर्ज.