Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला खुलासा

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Update 2025

Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Update 2025: महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेशी संबंधित महत्वपूर्ण विधान केले आहे.
हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, ज्या महिलांनी अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, अशा महिलांनी स्वतःहून त्यांची नाव मागे घ्यावीत. अशी विनंती हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल?


माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही या योजनेवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सूचित केले आहे की, अपात्र लाभार्थ्यांनी जर आपली नावे मागे घेतली नाहीत, तर त्यांच्याकडून दंडासह वसुली केली जाऊ शकते. याशिवाय, या योजनेच्या नियमांमध्ये भविष्यात अधिक कठोर बदल होण्याची शक्यता आहे.

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा ₹1,500 ची आर्थिक मदत दिली जात आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सध्या खालील निकष लागू आहेत:

  • ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे.
  • महिलांच्या घरातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन किंवा महिलेच्या नावावर दुचाकी वाहन नसावे.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकतो.

याशिवाय, राज्य सरकारने योजना जाहीर करताना स्पष्ट केले होते की नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांवर तक्रारीनुसार कारवाई केली जाईल.

महत्वाचे आवाहन


मंत्री हसन मुश्रीफ यांनी महिलांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांनी स्वतःहून नाव मागे घेतल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

🔴 येथे जाणून घ्या 👉 स्वतःहून नाव मागे घेण्याची प्रक्रिया.

हफ्त्याच्या रकमेत वाढ


अपात्र महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1,500 रुपयांचा हफ्ता वाढवून लाभार्थी महिलांना 2,100 दरमहा दिले जाण्याची शक्यता आहे.

सरकारने लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) नियमांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला असून, फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल यासाठी सरकारकडून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत.

🔴 हेही वाचा 👉 12वी पास असणाऱ्यांसाठी आधार सेवा केंद्र सुपरवाइजर बनण्याची मोठी संधी.

Share This Article