Ladki Bahin Yojana January Installment Latest Update: जानेवारीच्या हफ्त्याबाबत मोठी अपडेट

3 Min Read
Ladki Bahin Yojana January Installment Latest Update

Ladki Bahin Yojana January Installment Latest Update : राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) महत्वाच्या घडामोडी समोर येत आहेत. महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणाऱ्या या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही.

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana Update) महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत देण्यात येते. परंतु महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास उशीर झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कधी येईल जानेवारीचा हप्ता?

संकल्पना होती की, जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीपूर्वी म्हणजेच १४ जानेवारीपर्यंत जमा होईल. मात्र, आजअखेरीस महिलांच्या खात्यात हप्ता आला नाही. महाराष्ट्र सरकारकडून हप्ता लवकरच देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

९००० रुपये मिळाल्यानंतर पुढील तपासणीची चर्चा

महिलांना आतापर्यंत एकूण ₹9000 रक्कम दिली गेली आहे. मात्र, पुढील हप्ता देण्यापूर्वी सर्व अर्जांची तपासणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु सध्या केवळ तक्रारी आलेलेच अर्ज तपासण्याचे काम सुरु आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

अपात्र महिलांसाठी सूचना

लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा दंड आकारला जाईल, अशीही सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे पात्रतेसंदर्भातील कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे गरजेचे आहे. आणि जर आपण पात्र नसाल तर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरु होताच आपला अर्ज मागे घ्यावा जेणेकरून भविष्यात कारवाईला सामोरे जावे लागणार नाही आणि आत्तापर्यंत जमा झालेले पैसेही परत कराबे लागणार नाहीत.

🔴 हेही वाचा 👉 अपात्र महिलांसाठी दंडाची तरतूद.

मार्च महिन्यापासून ₹2100 मिळणार?

महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची (Ladaki Bahin Yojana) आर्थिक रक्कम वाढवण्याची घोषणा केली होती. मार्च २०२५ पासून ₹2100 हप्ता सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर अंतिम निर्णय होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

🔴 हेही वाचा 👉 2100 रुपये कधी मिळतील.

महिलांसाठी महत्त्वाचे पाऊल

लाडकी बहीण योजना ही केवळ महिलांना आर्थिक मदत पुरवणारी योजना नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे एक पाऊल आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा होईल, यावर महिलांना विश्वास ठेवण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

🔴 हेही वाचा 👉 तुमच्या घराच्या छतावर बसवा मोफत सोलर आणि मिळवा मोफत विजेचा लाभ.

Share This Article