Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र, आता या योजनेतून ६० लाख महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या योजनेतील अर्ज प्रक्रियेत कठोरता आणली जात आहे, आणि या बदलामुळे सध्या पात्र असणाऱ्या अनेक महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत देण्यात येते. सध्या महिलांना १५०० रुपये दिले जात असले तरी, लवकरच ही रक्कम वाढवून २१०० रुपये करण्यात येणार आहे. परंतु, यासाठी आधी पात्र महिलांचे अर्ज काटेकोरपणे तपासले जाणार आहेत. शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या विधानानुसार, 60 लाखांहून अधिक महिलांचे अर्ज बाद होणार आहेत आणि त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
योजनेतील नियमांची कडक अंमलबजावणी
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची सध्या काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे, किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय, ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन आहे, किंवा महिलेच्या नावावर दुचाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
छगन भुजबळ यांनीही याबाबत स्पष्ट केले आहे की, अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना स्वतः नावे काढण्यासाठी सांगितले जाईल. आणि जर त्यांनी वेळेत त्यांची नावे काढली नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल.
लाडकी बहीण योजनेची काटेकोर तपासणी प्रक्रिया
विनायक राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 60 लाखांहून अधिक महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत आणि त्यांना प्राप्त केलेली रक्कम परत करावी लागेल. योजनेच्या पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या सर्व महिलांना त्यांना मिळालेला लाभ परत करावा लागेल, आणि त्यांची नोंदणी रद्द केली जाईल.
भविष्यातील कारवाई आणि महिला सशक्तीकरण
चंद्रशेखर बावनकुळे यांनी योजनेच्या पुढील कार्यपद्धतीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, लाडकी बहीण योजनेला (Ladki Bahin Yojana 2025) सरकारने पुढे सुरू ठेवण्याचा व हफ्त्याची रक्कम वाढवण्याचा निर्धार केला आहे, परंतु नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई केली जाईल.
लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांवर कारवाई करण्यात येईल आणि त्यांनी घेतलेली रक्कम परत सरकारजमा करून घेतली जाईल. हे बदल जरी खुप कठोर वाटत असले तरी खऱ्या लाभार्थ्यांना या बदलांचा कसलाच त्रास होणार नाही. उलट यानंतर त्यांना लवकरच लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हफ्त्याचा लाभ मिळू शकतो.
🔴 हेही वाचा 👉 12वी पास उमेदवारांसाठी आधार सेवा केंद्र सुपरवाइजर बनण्याची मोठी संधी.
🔴 लेटेस्ट अपडेट 👉 मोठी बातमी! “मी पात्र नसल्याने लाडकी बहिण योजनेचा लाभ स्वतःहून सोडत आहे” असे लिहून द्याबे लागेल!.